News & Events

News & Events

पाडवा अर्थात बलिप्रतिपदा ! पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! आपणांस व आपल्या कुटुंबियांना पाडवा अर्थात बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा अंबाबाई मंदिरातील पवित्र काकडा कार्तिक मास अर्थत कडाक्याच्या थंडीत दिपावलीचा पहिला दिवस ज्या दिवसापासून अंबाबाई मंदिरातील नित्योपचारात बदल होतो . पुढील येणाऱ्या पोर्णिमेपर्यंत १५ दिवस हा बदल होतो . कार्तिकाचे व्रत करून जगदंबेच्या या काळातील पाचही आरत्या करण्याची परंपरा आहे . मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वात उंचावर कापूर लावतात त्यास ' काकडा " म्हणतात . कार्तिक मासात दिपदानाची धार्मिक परंपरा आहे . आकाशासाठी म्हणजेच वायुसाठी पूर्वीच्या काळातील सर्वोच्च स्थान म्हणजे मंदिराचे शिखर त्या ठिकाणी देवतेचा वास असतो या भावनेतूनच हि काकडा प्रज्वलीत करणेची परंपरा चालु झालेली असावी . पहाटे २ वाजता मशालीच्या मंद उजेडात काकडा प्रज्वलीत करतात . त्याचवेळी वाजंत्रींकडून शहनाई चा मधुर सुर चालु असतो . मुख्य शिखरानंतर परिसरातील इतर देवतांपुढे हा काकडा फिरवून पितळी उंबऱ्यावर कापूर लावुन मुख्य गर्भगृह उघडले जाते . त्यानंतर देवीची काकडारती होते . रात्री १० .१५ ला होणारी शेजारती ९: १५ ला होते . अंबाबाईचा सकाळचा अभिषेक पहाटे ५:3O ला व ११ . 3० ला होतो . दर शुक्रवारी होणारी रात्री ९ : 3O ला होणारी पालखी परिक्रमा ८: ४५ ला होते . कडाक्याच्या बोचऱ्या थंडीत पहाटे काकडत हातात काकडा घेऊन मुख्य शिखराकडे पाठ करून वर चढणे व प्रज्वलित करून पुन्हा खाली उतरणे हि सेवा तिच्या निस्सीम भक्तीखेरीज शक्यच नाहीदिर सुसज्ज

शहर कोल्हापूर बी वार्ड सि. स. नं. 187 'ख' या मिळकतीवरील श्री करवीर निवासिनी मंदिराकडे घाटी दरवाजाचे पश्चिम बाजूस असलेल्या सि. स. नं 192/अ, 195/अ, 196 या जागेवरील माऊली अपार्टमेंट ही इमारती खाजगी वाटाघाटीने थेट खरेदी करणे कामी हरकती मागविणे करता 15 दिवसाची जाहीर नोटीस प्रसिध्द, 15 दिवसात हरकती मागविल्या.

सर्व भाविक भक्तांना कळविणेत येते की , श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थानकडील नवरात्र उत्सव झाल्यानंतर अश्विनी पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजित करण्यात येत होते .परंतु चालू वर्षी अश्विनी पौर्णिमे दिवशी म्हणजेच दिनांक २८-१०-२०२३. रोजी चंद्रग्रहण असलेने,सदरचा महाप्रसाद हा सोमवार दिनांक ३०-१०-२०२३ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे सदर दिवशी भाविकांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहान देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्यामार्फत करण्यात येत आहे.

अंबाबाई मंदिर दर्शन वेळेत बदल

महालक्ष्मी मंदिरात भाविकांसाठी* दर्शन वेळेत बदल करण्यात आला आहे सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ३ ते रात्री ८ अशी करण्यात आली आहे. दुपारी १२ ते ३ यावेळेत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. भाविकांकडून मंदिरात करण्यात येणारे अभिषेक वगैरे धार्मिक विधी बंद केले आहेत. दर्शनासाठी असलेली ई - पासची सुविधा बंद केली आहे

भारतीय स्टेट बँक यांचेमार्फत ऑनलाईन देणगी सुविधा

भारतीय स्टेट बँक यांचेमार्फत देवस्थान समितीस ५५" - २ एल.ई. डी. स्क्रीन व भाविकांना प्रसाद निर्णय करिता ५०,००० कापडी पिशव्या देण्यात आल्या

श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत पूजा

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची मकर संक्रांतीला तिळगुळाच्या अर्थात हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. ही पूजा अविनाश गजानन मुनीश्वर यांनी बांधली.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे केदारलिंग जोतिबा देवस्थानच्या तोफेचे पूजन अध्यक्ष मा.महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले

तोफेची चाके नादुरुस्त झालेने हातळतांना त्रासदायक ठरू लागले होते इस्लामपूरच्या दख्खनचा राजा जोतिबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभिजित पाटील व सुशांत पाटील यांनी पुढाकार घेवून मा.अध्यक्ष व समितीशी चर्चा करुन काम करून देण्याची तयारी दर्शवली समितीचे मान्यतेने आज काम पूर्ण करुन दिले त्यानिमित्ताने आज विधीवत तोफेची पूजा करण्यात आली व देवस्थान समितीचे वतीने प्रतिष्ठानच्या सदस्यांचा यथोचित सन्मान मा महेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी देवस्थान समितीचे सदस्य राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक महादेव दिंडे,सरपंच राधा बुणे आणि गावकरी उपस्थित होते

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येत आहे.

अंबाबाई मंदिरात काम करणाऱ्या सुरक्षारक्षकांनी एका व्यक्तीला दिले जीवदान

करवीर: अंबाबाई मंदिरात सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या तिघांनी रंकाळा तलावात बुडणार्‍या व्यक्तीला दिले जीवनदान

Official Launch of Shri Ambabai Mahalaxmi Website & Social media

We are pleased to share the Official Launch of Shri Ambabai Mahalaxmi Temple Website and Social Media Accounts By Paschim Maharashtra Devasthan Samiti on 17th October 2020. The Website has been beautifully designed by Manorama SMAC & dedicated for daily Darshan & updates of Mahalaxmi Ambabai Temple. Devotees can get Live Darshan from the Website & App.

सेवा हाची धर्म रुग्णवाहिका गरजू रुग्णांसाठी

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व्यवस्थापनाच्यावतीने गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

भाविकांसाठी नवरात्रोत्सवाचे थेट प्रक्षेपण

करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव लोकसहभागाशिवाय पण उत्साहात करण्यात येईल. त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्यामुळे भाविकांना त्याचा आनंद घेणे शक्य होणार आहे, असे बैठकीनंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्रोत्सवाबाबत झाला 'हा' मोठा निर्णय

Ambabai Temple Navaratri राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कायम असून गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरातील शारदीय नवरात्र उत्सवाबाबत आज मह त्त्वाचा निर्णय घेण्यात आला.